११ वि प्रवेशासाठीची CET परीक्षा कशी असेल ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

 


 *११ वि प्रवेशासाठीची CET परीक्षा कशी असेल !  - जाणून घ्या महत्वाचे अपडेट*





 उस्मानाबाद  प्रतिनिधी अल्ताफ शेख  

 CET प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार आहे


 हि जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घेतली जाणार आहे - असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले 


 *पहा कशी होणार CET परीक्षा ?*


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे - CET प्रवेश परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे 


तसेच एकूण १०० मार्कांची ही परीक्षा असणार आहे यात  इंग्रजी, गणित, विज्ञान आणि  सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ मार्कांचे प्रश्न असणार आहेत


त्याचबरोबर परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे तर परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे


तसेच ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरले आहे त्यांच्याकडून CET परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही


दरम्यान CET परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे - या परीक्षेतील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश मिळणार आहे


 तसेच ज्या विदयार्थ्यांनी CET परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे - असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले  


 *शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली* - माहिती हि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या