*MIDC पोलीस स्टेशनची कामगिरी. सोयाबीन चोरांच्या आवळल्या मुसक्या, 7,54,150/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 आरोपींना अटक*

 *MIDC पोलीस स्टेशनची कामगिरी. सोयाबीन चोरांच्या  आवळल्या  मुसक्या, 7,54,150/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 आरोपींना अटक*






लातूर प्रतिनिधी 

                   या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 12/06/2021 रोजी लातूर जिल्ह्यात राहणारे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील सोयाबीनचे एकूण 419 पोते ट्रक मध्ये भरून MIDC येथील वेअर हाऊस ला पाठविले होते.रात्र झाल्याने ट्रक ड्रायव्हर ने सदरची ट्रक वेअर हाऊस कंपाउंडमध्ये लावून आराम करण्यासाठी घरी गेला व दुसऱ्या दिवशी वेअर हाऊस येथे येऊन पाहिले तेव्हा सदर ट्रकचे ताडपत्री फाडून त्यामधून 70 कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.

                  त्यावरून फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे MIDC येथे गुन्हा रजिस्टर नंबर 329/ 2021 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता.

                      सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी निर्देशित केले होते. त्यावरून अपर पोलिस अधीक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री. जितेंद्र जगदाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक के.बी.नेहरकर, पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख , व डी.बी. पथकाचे युवराज गिरी, मदार बोपले, मुन्ना मदने, प्रशांत ओगले, तसेच तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश कंचे यांचे पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना देण्यात आले होते.

            सदर पथक नमूद गुन्ह्याचा उघडकीस आणण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे  संशयित आरोपी नामे

1) संगमेश्वर चंद्रकांत हाके वय 26    वर्ष ,राहणार आसराचीवाडी

2) तानाजी शामराव लिंगे वय 34 वर्ष राहणार हरंगुळ ता. जि. लातूर.

3) अविनाश भाऊसाहेब हाके वय 20 वर्ष राहणार आसरा ची वाडी ह.मु. भांबरी, लातूर

4) किरण गुरुनाथ राठोड वय 22 वर्ष राहणार मोटेगाव ता.रेनापुर ह. मु. भांबरी, लातूर.

5) फिरोज अहमद शेख वय बावीस वर्ष राहणार तालुका निलंगा.ह.मु. भांबरी,लातूर.

यांना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेऊन  त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असून गुन्ह्यात चोरलेला असल्याचे कबूल केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला  मुद्देमाल 70 सोयाबीन किंमत 02, 54,150 /-रुपये व गुन्ह्यात वापरलेला  पिकअप असा एकूण 7,54,150/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

                   नमूद आरोपींना  सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख ,सलीम शेख हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या