*ब्रेकिंग! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता!*
कोरोना पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावण्यात येणार हे आपल्याला सांगण्यात आले. मात्र, निकाल कधी लागणार यावर प्रश्नचिन्ह होतेच!
राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या 16 जुलै रोजी 1 वाजता लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहे.
दहावीचा निकाल 'असा' लावला जाईल.
विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन - 30 गुण
विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन - 20 गुण
विद्यार्थ्यांचा 9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल - 50 गुण.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.