देशातील ओबीसी ची जन गणना करून सामाजिक न्याय द्यावा...आल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी चे प्रतिपादन...

 देशातील ओबीसी ची जन गणना करून सामाजिक न्याय द्यावा...आल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी चे प्रतिपादन...







औसा- धार्मिक आधारावर नव्हे तर राज घटने च्या चौकटीत असलेले हक्क आम्हास हवे आहे.आज पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजा चा केवळ राजकीय उपयोग केला.पण न्याय दिला नाही. म्हणून  शासनाने देशातील समस्त ओबीसी समाजाला आरक्षण देवुन समाज जीवन उंच करावे. असे प्रतिपादन आल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी केले.आज औसा येथे आल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा समिती ची बैठक झाली.यात मुस्लिम ओबीसी समाजाला  इतर सर्व समाजा प्रमाणे जीवन मान उंचावण्याचा अधिकार भारतीय राज्य घटने ने दिला आहे राज्य घटने च्या चौकटीतच आरक्षण देणे हे सरकार चे कर्तव्य आहे. असे ही ते म्हणाले.

यावेळी संघटने चे जिल्हाध्यक्ष  कलिमुद्दिन अहेमद यांनी जिल्ह्याचा आढावा मांडला.

नंतर पत्रकार म.मुस्लिम कबीर , शहर काग्रेसचे अध्यक्ष शकील शेख, चाकुर चे तांबोळी सलीम यांनी आपले विचार मांडले. संघटने चे तालुका अध्यक्ष डॉ.वहिद कुरेशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी व पाहुण्यांचे सत्कार करून आपले विचार मांडले.

या वेळी जिलाध्यक्ष कलीमोददीन अहमद ने बैठकीचे हेतू स्पष्ट केले शकील शेख, खाजा कुरेशी यूनुस चौधरी, गुलाब शेख सलाउद्दीन नंदूरगे मुस्लिम कबीर आदि उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या