भाजपा चे 12 आमदार निलंबन औसा येथे भाजपा चे आंदोलन

 लातूर - काल विधिमंडळात भाजपच्या  12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन केल्याने राज्यात गदारोळ माजला आहे. याचे पडसाद औसा औसा इथे सुद्धा उमटले आहेत. औसा येथील भाजप आमदार  अभिमन्यु पवार यांना सुध्दा निलंबित करण्यात आले आहे. यावर औसा शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. 




ओबीसी आरक्षणाचा ओ बी सी आरक्षण प्रश्नावर भाजपचे विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले नाही. म्हणून त्याचा जाब विचारत असताना औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह 12 आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे यावर औसा इथं भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.


आज औसा इथं भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्याचे तंत्र उध्दवा नाही चालणार तुझं षडयंत्र , महाविनाश आघाडीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या