पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी, 15700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, 08 इसमावर 3 गुन्हे दाखल, 5 आरोपींना अटक*


                *पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी, 15700/-  रुपयांचा मुद्देमाल  जप्त, 08  इसमावर 3 गुन्हे दाखल, 5 आरोपींना अटक*






लातूर प्रतिनिधी


                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक 22/07/2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव,पोलिस उपअधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकांना  मिळालेल्या गोपनीय माहिती च्या पोलीस स्टेशन वाढवणा च्या हद्दीतील हाळी गावात शिरूर-ताजबंद ते उदगीर जाणारे रोडवरील एका ज्युस सेंटर च्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम मिलन डे, राजधानी डे नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे. अशी माहिती मिळाल्याने विशेष पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. तेथे आरोपी नामे

1) विक्रम विनोद शिंदे, वय 23 वर्ष, राहणार -हाळी हा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला. त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 4,170/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

                        सदर इसम व बुकी जावेद शेख, राहणार-हाळी यांचे विरोधात पोलीस ठाणे वाढवणा येथे गुरनं. 126/2021 कलम.12 (अ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

                  सदर पथकाने त्याच ठिकाणी असलेल्या आणखीन एका जागी छापा मारला. त्या ठिकाणी इसम नामे

1) परमानंद गुंडेराव वाघमारे, वय -52 वर्ष राहणार -हंडरगुळी.

2) बालाजी रामराव वाघोजी, वय-36 वर्ष ,राहणार- हंडरगुळी. हे मिलन डे, कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून कडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 3,340/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

                      सदर इसम व बुकी बाबुलाल शेख, राहणार-हंडरगुळी यांचे विरोधात पोलीस ठाणे ,वाढवणा येथे गुरनं.127/2021 कलम.12 (अ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

                      तसेच स्थानिक गुन्हे शाखा,लातूर च्या पथकाने त्यांना मिळालेल्या  माहितीवरून छ. शिवाजी चौक , वाढवणा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये  काही इसम टाईम बाजार नावाचा जुगार खेळत व खेळत आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. तिथे आरोपी नामे

1) मोहिन मकबूल बागवान वय-36 वर्ष ,राहणार -वाढवणा

2)हकीम बुरहान बागवान ,वय 30 वर्ष राहणार -वाढवणा

हे जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 8,240/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसम व बुकी बब्रू  कुरेशी टेलर यांचे विरोधात  पोलीस ठाणे वाढवणा येथे गुरनं. 125/2021 कलम. 12 (अ)  मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

              सदर तिन्ही गुन्ह्याचा पुढील तपास वाढवणा पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या