सुनेनी दिली सासुला भडागणी
औसा(सा.वा.)दि. 21
आपण आतापर्यंत आई-वडील मयत झाल्यावर त्यांचा असलेला मुलगाच चितेला अग्नी दिलेले ऐकलेले आहे. कालांतराने ज्या ठिकाणी मुलगाच नाही अशा घरात अशी एखादी दुखद घटना घडल्यावर मुलीने चितेला अग्नी दिलेली आपण ऐकलो आहोत, पेपरमध्ये वाचलेही असेल परंतू ज्या ठिकाणी सासरा नाही किंवा पतीही नाही अशा वेळेस सासूबाईचे निधन झाल्यावर त्या मयत व्यक्तीला कोण पाणी पाजणार आणि अग्नी कोण देणार असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थीत पाहुणे मंडळीला पडल्याशिवाय राहत नाही अशीच दुखद घटणा औसा शहरात घडलेली असतांना मोठ्या धाडसाने सुनेनी सासुला भडागणी दिलेली आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, औसा शहरातील प्रभाग १ मध्ये राहणारे पांचाळ कुटूंबात घटणा घडलेली आहे. सासरे यांचे निधन झाल्यानंतर दहा पाच वर्षात पतीचेही निधन होऊन 12 वर्ष संपून गेले तेव्हांपासून कुंटूंबात असलेल्या दोन सासा व एक स्वतःची मुलगी असा कुंटूंबाचा गाडा चालवत असतांनाच गेल्या वर्षी मावस सासू असलेली निर्मलाबाई पाचाळ यांचे निधन झाले. त्यावेळेसही या बहादुर असलेल्या सुनेने सुलाबाई दिपक पांचाळ यांनी मोठ्या हिमतीने त्या वेळेस चितेला भडागणी दिली. आणि आनखीन मावस सासुचे निधन होऊन एक वर्ष सुध्दा झालेले नाही आणि आज २०जुलै २०२१ रोजी संपदाबाई पांचाळ सासूचे पहाटेच्या सुमारास निधन झाल्याने आभाळ कोसल्यागत हाल होऊनही मोठ्या हिमतीने सुलाबाई दिपक पांचाळ या महिलेनी आपली असलेली सासू संपदाबाई पांचाळ यांच्या चितेला भडागणी देऊन एक तमाम महिलेपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.