*फळभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर; वांगी, शेवग्याचे दर चढेच, पालेभाज्या उतरल्या*
दि. 23 - उस्मानाबाद -
*गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी फळ व पालेभाज्यांची लागवड कमी प्रमाणात केली होती.*
*पालेभाज्या व फळभाज्यांचे क्षेत्र घटल्याने मागणीच्या तुलनेत बाजारात भाज्यांची आवक कमी होती. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले.*
*परिणामी डाळींना मागणी वाढल्याने डाळींच्या दरातही मागील सहा महिन्यांपूर्वी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती.*
*खरीपात शेतकऱ्यांचा भाज्याऐवजी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके घेण्याकडे कल अधिक असतो. ज्या शेतकऱ्यांनी फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्या भाजीपाल्याचे पावसाने नुकसान होते. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत काही फळभाज्यांचा तुडवडा निर्माण होतो. त्यामुळे दर वाढतात.*
सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा महागलेलाच आहे. सध्या बाजारात गवार ४० ते ५० रुपये,पत्ताकोबी ३० रुपये, फ्लॉवर ३० ते ४० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, चुका या भाज्यांची जुडी १० रुपयास विक्री होत आहे. तर विविध डाळींचे दर मात्र स्थिर आहेत.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* * प्रतिनिधी **महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.