महानगरपालिके मार्फत 18 वर्ष व त्यापुढील
वयोगटासाठीचे लसीकरण 4 केंद्रावर होणार*
लातूर,दि.20(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 21 जूलै 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 वर्षे पुढील वयोगटासाठीचे (कोव्हॅक्सीन- फक्त दुसरा डोस) मोफत कोविड लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Govt. I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09) व पं. जवाहरलाल नेहरु मनपा रुग्णालय पटेल चौक (दुपारी 12 ते सायं.5.00) लातूर येथे 18 वर्ष व त्यापुढील वयोगट कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. कोव्हॅक्सीन फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) सर्व चार केंद्र.
(कोविशिल्ड लस उपलब्ध् नाही. ऑनलाईन 50 टक्के ऑनस्पॉट 50 टक्के. प्रमाण प्रत्येक केंद्रावर कोव्हॅक्सीन एकुण 100 डोसेस, ऑनलाईन 50 डोसेस, ऑनस्पॉट 50 डोसेस सकाळी 10.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत राहील.
कोविशिल्ड लसीचा साठा अपुरा असल्यामुळे 18 ते 44 वर्षे व 45 वर्षापुढील वयोगटातील नागरीकांना कोविशिल्ड डोस उद्या दिला जाणार नाही. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील. लसीकरणासाठी येताना लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल फोन सोबत ठेवावे. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर व इतर लसीकरण सत्र उदया बंद ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन बुकींग सायंकाळी 7.00 वा.चालू करण्यात येईल तरी जास्तीत जास्त नागरीकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. कोविड-19 लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास मनपा हेल्पलाईन क्र. 9158632333 यांचेशी संपर्क करावा.असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका, मार्फत करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.