जयक्रांती माध्यमिक विदयालयाचा एस.एस.सी परीक्षेत निकाल 100 टक्के
गुणंवत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला
लातूर-मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत जयक्रांती माध्यमिक
विदयालयाचा 100 टक्के निकाल लागला असुन 100 टकके गुण प्राप्त करणारे चार विदयार्थी सृष्टी कोल्हे,तेजस्विनी सूर्यवंशी, प्रसाद राशिनकर, शामबाला तौर आहेत. 90 टकके पेक्षा जास्त गुण घेणारे 37 विदयार्थी आहेत. तर विशेष प्राविण्यामध्ये 31 विदयार्थी यांनी यश संपादन केले आहे. या बददल गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत घारसर, प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीकृष्णा बदिने,पर्यवेक्षक तानाजी घाटके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.रंदाळे जी.व्ही यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.माने जी.एस यांनी मानले.
या यशाबददल गुणवंत विदयार्थ्याचे अभिनंदन भारत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.गोविदराव घार, अध्यक्ष बालाजीराव घार, पर्यवेक्षक तानाजी घाटके, सहशिक्षक माळी एन.पी, कुलकर्णी बी.एम,डॉ.माने जी.एस, डॉ.शिंदे एस.एस, सिंधीकुमठे व्ही.पी,भेंडेगावे एस.ए,येळंबकर ए.एम, कांबळे ए.व्ही,सौ.तपसाळेमॅडम,सौ.कुदळे मॅडम, वारकड एस.एम, साठे एस.के, नंदकिशोर थंबा, अमोल पवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विदयार्थी यांचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.