डॉ.मल्लिकार्जुन करजगी लिखीत एस.एस.आर.प्रिपरेशन - अंडरस्टॅडींग द रिसेंट नॅक प्रोसेस पुस्तकाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
लातूर : येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. समन्वयक तथा इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.मल्लिकार्जुन करजगी लिखीत व अरुणा प्रकाशन, लातूर यांनी प्रकाशीत केलेले "एस.एस.आर.प्रिपरेशन - अंडरस्टॅडींग द रिसेंट नॅक प्रोसेस " या पुस्तकाचे प्रकाशन मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर चे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, लेखक डॉ.मल्लिकार्जुन करजगी, सुपर्ण जगताप व सोनु डगवाले आदींची उपस्थिती होती.
सहकारी कारखानदारीमध्ये दर्जा उंचावण्यासाठी नॅकप्रमाणेच मुल्याकंन केले जाते. मुल्याकंनामुळेच साखर कारखान्यांची गुणवत्ता उंचावण्यास मदत होते. "मांजरा" परिवारातील कारखान्यांनी अधिकृत संस्थेकडून मुल्याकंनाद्वारेच आजपर्यंत अनेक पारितोषीके मिळविलेली आहेत. त्याचप्रमाणे सदरील पुस्तक हे प्रथमच नॅकला सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास दिलीपराव देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
एस.एस.आर.प्रिपरेशन - अंडरस्टॅडींग द रिसेंट नॅक प्रोसेस या पुस्तकामध्ये नॅकची नविन प्रक्रिया, फिसची रचना, ऑनलाईन एस.एस.आर. सादर करतांनाची आवश्यक माहिती, ऐच्छिक मेट्रीक्स, विविध टर्मस्, एस.ओ.पी. व बेस्ट पॅक्टीसचा आराखडा इत्यादीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. म्हणुनच हे पुस्तक प्रथमच नॅकला सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास लेखक डॉ.मल्लिकार्जुन करजगी यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.