उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे विशेष पथकाची धडाके बाज कामगिरी लातूर शहरातील चोरी गेलेल्या 19 मोटार सायकली किंमत11,15,000/- चा मुद्देमाल जप्त व दोन आरोपी गजाआड
उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर येथील कार्यरत असलेल्या विशेष पथकाने लातूर शहरात वाढत असलेल्या वाहन चोरी बाबत विशेष मोहीम आखून त्याबबात नियोजन केले. विशेष पथकाने गुप्त बामतीदाराची नेमुणक करुन गुप्त बातमीच्या आधारे आज रोजी राजे शिवाजीनगर, (वसवाडी) लातूर येथे सापळा लावून आरोपी नामे अविनाश ऊर्फ बापु तानाजी येमगर, वय 27 वर्षे, रा. रामवाडी, ता.जि. उस्मानाबाद, ह.मु. राजे शिवाजीनगर, लातूर व आरोपी नामे मच्छिद्र दत्तात्रय क्षिरसागर, वय 25 वर्षे, रा. किल्लारी, ता. औसा, जि.लातूर ह.मु. वाल्मीकीनगर, लातूर यांना राजे शिवाजीनगर, (वसवाडी) लातूर येथे दोन चोरीच्या मोटार सायकलसह रंगेहात पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता, त्यानी सदर मोटार सायकल चोरीचे असल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, लातूर शहर, मरुड, औसा, येथून मोटार सायकल चोरल्याचे कबुली देऊन एकूण 19 मोटार सायकल किमत 11,15,000/- (अकरा लाख पंधरा हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार 1) तुकाराम मनोहर कुंभार, रा.हारेगाव ता. औसा जि.लातूर ह.मु राजे शिवाजी नगर, (वसवाडी) लातूर 2) सुनिल ऊर्फ बाळा वसंत कोळपे रा.तेर ता.जि. उस्मानाबाद हे दोघे फरार आहेत त्यांचा शोध घेणे चालू आहे. सदरचे गुन्हे हे वरील चौघांनी मिळून मोटार सायकल चोरी केलेले आहेत. सदर चारही आरोपी मोटार सायकल चोरीचे सवईचे आहेत. मोटार सायकलची खात्री केली असता पो.स्टे एम.आय.डी.सी, पो.स्टे विवेकानंद चौक, पो.स्टे शिवाजी नगर, लातूर पो.स्टे मुरुड, पो.स्टे औसा येथे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे विशेष पथकातील पो.उप.नि. किरण पठारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहीद शेख, पो.हे.कॉ./ रामचंद्र ढगे, पो.ना./महेश पारडे, पो.ना./अभिमन्यु सोनटक्के, पो.कॉ./गणेश मोरे, पो.कॉ/ सोमनाथ खडके, यांनी सदर मोटार सायकल चोरी करणारी टोळी उघड करुन मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर पोलीस दलाचे वतीने नागरिकांना अवाहन करण्यात येते की, नागरीकांनी आपल्या मोटार सायकली सुरक्षित ठिकाणी हॅन्डल लॉक करुन लावाव्यात तसेच जुने वाहन खरेदी विक्री करताना कागदपत्राची पाहणी करुनच व्यवहार करावा. संशयीत वाहन निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क करावा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.