संभाव्य तिस-या लाटेशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड-19 ची लस घेणे अत्यंत आवश्यक पालकमंत्री अमित देशमुख

 

संभाव्य तिस-या लाटेशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड-19 ची लस घेणे अत्यंत आवश्यक

पालकमंत्री अमित देशमुख










*बाधित रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे या संदर्भाने लागू असलेले निर्बध शिथील होणार असले तरी या परिस्थितीत आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे

 *तिसऱ्या लाटेत सांगितली जाणारी संभाव्य रूग्णसंख्या लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रमाणात बेडऔषधेव्हेन्टिलेटरवैदयकीय साधने उपलब्ध करून ठेवावीत.

 *जिल्हयात शासकीय रूग्णांलयाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लॅटच्या कामाला गती दयावी.

 *लसीकरण मोहिम सुलभ आणि सुसुत्र पध्दतीने गतीमान करावी

  *गाववॉर्डप्रभाग आणि शहरांना केंद्रित करून त्या ठिकाणी शंभर टक्के लसीकरणाचे उदिष्टय पूर्ण करावे.

  *टास्क् फोर्सच्या सुचनेनुसार आवश्यकतेनुसार लहान मुलांचे वॉर्ड आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करावी.

 * शासनाकडून वेळोवळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहून शाळाकॉलेज सुरू करण्याबाबत पूढाकार घ्यावा.

  *आयएमए आणि लातूर महापालीका यांच्या संयुक्त विदयामाने शहरात लहान मुलांसाठी जम्बो कोविड सेंटर करण्या बाबत कार्यवाही सुरू करावी.

  *वाढत्या प्रादूर्भावाच्या काळात रूग्णवाहीकांची कमतरता भासणार नाही शिवाय त्यांचे दर नियंत्रणात रहावेत यादृष्टीने आत्ताच काळजी घ्यावी आदी सुचना  निर्देश या बैठकी दरम्यान दिले आहेत

 

लातूर,दि.31

 कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक नगरिकाने कोविड-19 ची लस घेणे अत्यंत आवश्यक आहेसंभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनायोग्य नियोजन करून प्राधान्याने लशीची दुसरी मात्र देण्याची सूचना पालकमंत्री अमित देश्मुख यांनी केली.कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहेलसीकरण सुरू आहे मात्रनागरिकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहेकोवीड१९ प्रादूर्भावाची संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरविण्यासाठी करण्यात येत असलेली पूर्वतयारी आणि सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गती द्यावीअसे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोविड-19 आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी लातूर महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बि.पिजिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,मनपा आयुक्त अमन मित्तल,ॲड.दीपक सूळ,जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड.किरण जाधव,विजय देशमुख,समद पटेल,चंद्रकांत मद्दे,कल्याण पाटील,अभय साळुंके,संतोष सोमवंशी,सुनिता चाळक,लिंबनअप्पा रेशमे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉलक्ष्मण देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

लातूर जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे झाली नाही , केंद्राकडून आवशयक प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध झाल्यावर जिल्हाभर एक गाव एक दिवस आणि एक प्रभाग एक दिवस असा नियोजन करून शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्देश समोर ठेवुन जिल्हा प्रशासन , मनपा आणि आरोग्य यंत्रणेने काम करावे.माहिती  जनसंपर्क विभागाने लसीकरणाचे महत्वाबाबत जनजागृतीपर प्रसिध्दी मोहीम राबवावी,  राज्य आणि देशाबाहेर जाण्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले असून अनेक राज्यांमध्ये प्रवेशासाठी लस घेतलेल्या नागरिकांना ॲन्टीजन टेस्ट आणि आर टी पी सी आर यासारख्या चाचण्यापासून सूट देण्यात येत आहे.तसेच अनेक शासकीय  अशासकीय संस्थांच्या योजनांसाठीही लस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 

वैद्यकीय यंत्रणेला सूचना देतांना पालकमंत्री म्हणाले जिल्हयात शासकीय रूग्णांलयाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लॅटच्या कामाला गती दयावी तसेच टास्क् फोर्सच्या सुचनेनुसार आवश्यकतेनुसार लहान मुलांचे वॉर्ड आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करावी.त्याचबरोबर आयएमए आणि लातूर महापालीका यांच्या संयुक्त विदयामाने शहरात लहान मुलांसाठी जम्बो कोविड सेंटर करण्या बाबत कार्यवाही सुरू करावी.वाढत्या प्रादूर्भावाच्या काळात रूग्णवाहीकांची कमतरता भासणार नाही शिवाय त्यांचे दर नियंत्रणात रहावेत यादृष्टीने आत्ताच काळजी घ्यावी .

लातूर जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्बंधांचे -यापैकी पालन केल्याने कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली तरी काही दिवसांपासून जिल्ह्याचा आकडा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.जिल्ह्यात आज एकूण 162 रुग्ण बाधित आहेत.गेल्याआठवड्यात ही संख्या फार कमी होतीनागरिकांनी याकडे दुर्ल्क्ष करू नये अथवा कुठल्याही प्रकारची लापरवाई करू नयेमास्क सॅनेटायझरसोशल डिसटंस आणि इतर आवश्यक गोष्टींना अंगिकारणे आवशयक असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री अमित देश्मुख पुढे म्हणाले,कोव्हिड-19 ची तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना करतो,परंतू कोव्हिड-19 चा डेल्टा प्लस व्हेरियंट युरोपियन देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे.त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात 165 ठिकाणी 18 DCH, 93 DCHC,  आणि54 DCCC सज्ज आहेत . यामध्ये 12046 टोटल आयसोलेशन बेड, 4044 ऑक्सीजन बेड, 1169 ICU बेड,आणि 457 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत.कोरोनावरील उपायकारक औषाधींचा साठाही आवश्यक प्रमाणात उपलब्ध असून लहान मुलांसाठी सुध्दा स्वतंत्र वार्ड निर्माण करण्यात येत आहे.तसेच बालरोग तज्ञांची सेवाही उपलब्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात आजपर्यंत 5 लाख 56 हजार 793 जणांना लस देण्यात आले असून यापैकी 1 लाख 67 हजार 6 जणांना दोन्ही लस देण्यात आल्या आहेतजिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यंत्रणेने ग्रांमीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबर गावांमध्येही लसीकरणाचे नियोजन करावे.

लातूर जिल्हा कोरोनाच्या महामारी मधुन बाहेर पडतांना दिसत असल्याचे श्रेय राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचा काटेकोर पालन केल्याने लातूर वासीयांना जात आहेतथापि अजुनही कोविड-19 पूर्णपणे हद्दपार झाला नसून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करणे अधिक गरजेचे  आहेसामाजिक बैठका,लग्न समारंभ आणि इतर अनावश्यक गर्दीचे प्रमाण कमी करावे असे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या