रामनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आलमला : श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 31 जुलै रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) २०२०-२१ परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ सौ अनिता पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शिवाजी आंबुलगे श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे संचालक उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या परीक्षेत उत्तीर्ण ठरलेले विद्यार्थी मुलानी सादिक, लोणारे स्नेहा, चित्ते अंकिता, चित्ते भूमिका, वाघमारे किरण, मुर्गे मन्मथ यांचा व तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आवटे अफसर, आंबुलगे रंगनाथ, पंडगे नरसिंग, सौ अमरजा उकिरडे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी आंबुलगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी सी पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.