पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा , देशातील पहिलीच घटना
तेलंगाणा राष्ट्र समितीच्या खासदार मलोत कविता यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे
हैदराबाद : निवडणुकीदरम्यान नेत्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप अनेकदा होत असतो . पण , पैसे वाटल्याप्रकरणी खासदारला शिक्षा झाल्याचे पहिलेच प्रकरण हैदराबादमध्ये घडले आहे . मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी तेलंगाणातील महबूबाबादच्या आणि तेलंगाणा राष्ट्रीय समिती ( TRS ) च्या खासदार मलोत कविता ( Maloth Kavitha ) यांना नामपल्लीमधील एका विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे . मलोत कविता यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे दिल्याच्या प्रकरणता दोषी ठरवले आहे . कोर्टाने त्यांना दहा हजार रुपये दंढ आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे . पण , त्यांना हायकोर्टात अपील करण्यासाठी परवानगी असेल . आता लवकरच मलोत कविता हाय कोर्टात अपील करू शकतात .
असा झाला खुलासा ही घटना तेव्हा समोर आली , जेव्हा 2019 मध्ये महसुल अधिकाऱ्यांनी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अलीला पैसे वाटताना रंगेहात पकडले होते . शौकत अली बर्गमपहाड परिसरातील मतदारांना एका मतासाठी 500 रुपये देत होते . यानंतर पोलिसांनी आधी शौकत अलीवर आणि त्यानंतर मलोत कविता यांच्यावर मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला . कोर्टात परावे सादर सुनावणी पोलिसांनी दरम्यान फ्लाइंग स्काव्डच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले . चौकशीदरम्यान शौकत अलीने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.