निलंगा शहरात 28 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई,
साडे सात हजाराचा दंड वसूल*
लातूर, दि.15(जिमाका):- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा 2003 नुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने निलंगा शहरात अचानक धाडी टाकून 28 तंबाखू विक्रेत्यांकडून 7 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही धडक मोहीम जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आल्याची माहिती जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटीकर यांनी दिली.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका मध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात दंतशल्यचिकिस्तक डॉ. कोडगी, जिल्हा सल्लागार डॉ.माधुरी उटीकर, निलंगा येथील पोलीस अधिकारी कर्मचारी श्री.एच. एस. पडिले, एस. एस. शिंदे, तसेच श्री फुलसुंदर उ. जि. रु. निलंगा. श्री.प्रकाश बेम्बरे श्रीमती.संध्या शेडोळे , श्री. अनिल कुंभारे हे उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धूम्रपान केल्याने कोरोंना , क्षयरोग व स्वाईनफ्ल्यु सारख्या संसर्गजन्य आजारांच्या संक्रमणाचा धोका वाढतो. याबाबीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरात कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे ज्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण करणार्यांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी कोटपा 2003 कायद्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.