पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी. 49,600 /- रुपयाचा विदेशीदारु कारसह जप्त.*



                *पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची  कामगिरी. 49,600 /- रुपयाचा विदेशीदारु  कारसह  जप्त.*






लातूर प्रतिनिधी 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी  अवैध धंद्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाने तयार  केले आहेत. दिनांक 15/07/2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली  सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे छ.शिवाजी चौकात विनापास परवाना विदेशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी विदेशीदारूची वाहतूक करणारी एक अल्टो कार येणार आहे.अशी माहिती मिळाल्याने विशेष पथकाने छ.शिवाजी  चौकात सापळा लावला.

                थोड्याच वेळात मिळालेल्या बातमी नुसार एक पांढऱ्या रंगाची अल्टो कार क्रमांक एम.एच.24 .सी.7708 अशी रोडने येताना दिसली. विशेष पथकाने सदर अल्टो कारला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूचे  बॉक्स व बाटल्या किमती 49 हजार 620 रुपयाची दारू मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सदरचा दारू मुद्देमाल आणि अल्टो कार सह एकूण 2,49,620 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे विदेशी दारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक  करणारा इसम

1) विजय गोविंद शिरसागर, वय 32 वर्ष ,राहणार- तावर्जा कॉलनी, कोल्हे नगर, लातूर हा मिळून आला. त्याच्याकडे दारूविक्री परवाना बाबत विचारले असता त्याने त्याच्याकडे दारूविक्री  परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमा विरोधात पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुरनं  279/2021 कलम. 65(अ)(ई),महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

                   

             सदरच्या विशेष पथकात  पोलीस अमलदार चंद्रकांत डांगे,  लक्ष्मीकांत देशमुख, मोहन सुरवसे , रमेश चौधरी, गणेश खंदाडे, चालक पोलीस अंमलदार शेंडगे यांचा सहभाग होता.

               सदर गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे  पोलीस अंमलदार अशोक चौगुले हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या