पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची उदगीर येथे अवैध धंद्यावर छापेमारी.... जवळपास. 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.3 गुन्हे दाखल*

    *पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची  उदगीर येथे अवैध धंद्यावर छापेमारी.... जवळपास. 3 लाख रुपयांचा मुद्देमाल  जप्त....3 गुन्हे दाखल*






      लातूर प्रतिनिधी          या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी  अवैध धंद्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाने तयार  केले आहेत. 

                दिनांक 16/07/2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली  सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे उदगीर येथील उमा चौकात विनापास परवाना विदेशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशीदारूची वाहतूक करणारी एक अल्टो कार येणार आहे.अशी माहिती मिळाल्याने विशेष पथकाने उमा चौकात सापळा लावला.

                थोड्याच वेळात मिळालेल्या बातमी नुसार एक पांढऱ्या रंगाची अल्टो कार क्रमांक एम.एच.24 .व्ही.7669  रोडने येताना दिसली. विशेष पथकाने सदर अल्टो कारला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे  बॉक्स व बाटल्या एकूण किंमत17 हजार 280 रुपयाची दारू मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सदरचा दारूचा मुद्देमाल आणि अल्टो कार सह एकूण 2,67,280/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशी दारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक  करणारा इसम

1) सचिन राजकुमार मसुरे,वय 28 वर्ष ,राहणार- सोमनाथपूर रोड फुलेनगर, उदगीर.

 हा मिळून आला.त्याच्याकडे दारूविक्री परवाना बाबत विचारले असता त्याने त्याच्याकडे दारूविक्री  परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमा विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं  275/2021 कलम. 65(अ)(ई),महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

      

                  सदर पथकाने  उमा चौकातच कल्याण ,टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने आरोपी नामे

1) शेख अलिमुद्दिन जिलानी,वय 19 वर्ष ,राहणार - सात सैलानी गल्ली उदगीर.

2) गणेश पंढरीनाथ उदबाळे,राहणार - सात सैलानी गल्ली उदगीर.

 यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 23 हजार 230/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यांचे विरुद्ध उदगीर ग्रामीण येथे गुरनं  274/2021 कलम.12 (अ)  महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनचे  पोलीस करीत आहेत.

             

                      तसेच स्थानिक गुन्हे शाखा,लातूर च्या पथकाने पोलीस ठाणे चाकूर हद्दीतील लातूर ते उदगीर जाणारे रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेले आरोपी नामे 

1) मोहम्मद रफी जलील शेख, वय 32 वर्ष ,राहणार आष्टा तालुका चाकुर.

2) नर्सिंग ज्योतीराम नरके ,राहणार - रत्नापूर चौक ,लातूर.

 यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 10 हजार 950 रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यांचे विरुद्ध  पोलीस स्टेशन चाकूर येथे गुरनं.312/2021 कलम.12 (अ) महाराष्ट्र  जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              सदर गुन्ह्याचा तपास चाकूर पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या