हक्काच घर मिळालं नाही प्रशासनाने तात्पुरत्या घरातून काढले पावसाच्या तोंडावर धोंडिराम शिंदे यांचे घर उघड्यावर

 हक्काच घर मिळालं नाही प्रशासनाने तात्पुरत्या घरातून काढले पावसाच्या तोंडावर धोंडिराम शिंदे यांचे घर उघड्यावर 

"कोणी घर देतं का घर "

अशी अवस्था शिंदे कुटुंबाची









औसा प्रतिनिधी विलास तपासे 

नटसम्राट चित्रपट पाहिल्यानंतर त्यामध्ये नाना पाटेकर यांनी साजलेल्या भुमिकेमध्ये "कोणी घर देतं का घर" ह्या डायलॉग प्रमाणे शिंदे कुटुंबियांची अवस्था झाली आहे. 

३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी परिसरात भुकंप झाल्यामुळे शासनाने मौजे किल्लारी या गावचे पूनर्वसन करुन घरकुल मंजूर केले कैलासवासी भिमराव शंकर शिंदे यांना घर क्र. ४३(अ) घरकुल मंजुर करण्यात आले होते  परंतु घर क्रमांक ४३ देण्यात आले नाही त्यांना तात्पुरते दुसऱ्या घरात राहण्याची परवानगी दिली परंतू गेल्या दोन महिन्यांत 

प्रशासनाने त्या तात्पुरत्या घरातून भिमराव शिंदे यांचा मुलगा धोंडीराम शिंदे यांना नोटीस देऊन घराबाहेर काढले. हे कुटुंब बाहेर काढल्या मुळे या कुंटुंबानी आपला संसार उघड्यावर मांडला आहे एकिकडे कोरोनाचा महामारी कमी होण्याचे नाव घेत नाही अनेक वेळा प्रशासनाने असे आवाहन केले की मास्क लावा घरी बसा परंतू ह्या कुटुंबाला अशी वेळ आली आहे की हक्काचे घर नाही तात्पुरत्या घरातून बाहेर काढले  दुसरीकडे पाऊस डोक्यावर पडत आहे प्रपंच उघड्यावर आहे मोल मंजूरी केल्याशिवाय पोट भरत नाही तरीही प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही २८ वर्ष झाले तरीही या कुंटुबाला घरकुल मिळाले नाही. 

किल्लारी येथील रहवासी असलेले धोंडीराम भीमराव शिंदे यांना भूकंपग्रस्त पुनर्वसन मध्ये मिळालेले घर त्यांना 28 वर्ष होऊन ही मिळाले नाही ते शासनाच्या एका रिकाम्या घरात तात्पुरत्या स्वरूपात राहत होते ऐन कोरोना काळात पावसाळा समोर असताना त्यांना घराबाहेर काढले त्यांना परत त्यांचे हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे म्हणून आज जिल्हाअधिकारी  लातूर वंचित बहुजन आघाडी औसा तालुका व जिल्हाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हाअध्यक्ष जगदीशजी माळी,मराठवाडा विभागीय महासचिव रमेश गायकवाड,कायदेशीर सल्लागार रोहित सोमवंशी,कायदेशीर सल्लागार सुभेदार मादळे, जिल्हा उपाध्यक्ष शाम पावले,औसा तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरुळे,तालुका महासचिव सुभाष भालेराव,तालुका महासचिव श्रावण कांबळे,तालुका उपाध्यक्ष नागसेन गायकवाड,ता.उपाध्यक्ष सूर्यकांत उबाळे,ता.उपाध्यक्ष योगेश पाटील,राम पोवाडे,सद्दाम शेख,रफिक शेख,आबेद शेख उपस्थित होते. 

आठ दिवसाच्या आत शिंदे कुटुंबाला घर मिळाले नाहि तर वंचित बहुजन आघाडी औसा तालुका च्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा औसा तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरुळे यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या