पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी, 46,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, 17 इसमावर 3 गुन्हे दाखल,07 आरोपींना अटक*

 *


                *पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी, 46,000/-  रुपयांचा मुद्देमाल  जप्त, 17 इसमावर 3 गुन्हे दाखल,07 आरोपींना अटक*





       लातूर प्रतिनिधी        या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक 21/07/2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकांना  मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे वलांडी तालुका देवनी येथील गावात जाणारे रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम मिलन डे, कल्याण मटका जुगार  खेळत व खेळवीत आहे अशी माहिती मिळाल्याने विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता

                तिथे आरोपी नामे

1) किशोर दिगंबरराव पाटील, वय- 36 वर्ष , राहणार , वलांडी तालुका देवणी.

2) गणेश पंढरीनाथ कांबळे वय 26 वर्षे, राहणार सय्यदपुर, तालुका देवनी.हे जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 2,660/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसम व बुकी विरोधात  पोलीस ठाणे देनी येथे गुरनं. 214/2021 कलम. 12 (अ)  मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

                  सदर पथकाने त्याच ठिकाणी असलेल्या आणखीन एका जागी छापा मारला. त्या ठिकाणी इसम नामे

1)  किशोर राचया चांगरले, वय 29 वर्ष, राहणार- वलांडी तालुका देवनी. हा मिलन डे, कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला. त्याचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 33,010/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर इसम व बुकी विरोधात पोलीस ठाणे देवनी येथे गुरनं. 215/2021 कलम.12 (अ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

      दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास देवनी पोलीस करत आहेत.

                      तसेच स्थानिक गुन्हे शाखा,लातूर च्या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून लातूर शहरातील साळे गल्ली परिसरात शिवाजी लक्ष्मण राऊत यांचे घरावर स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर तिरट तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली वरून सदर पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता तेथे आरोपी नामे

1) शिवाजी लक्ष्मण राऊत, वय 33 वर्ष, राहणार साळे गल्ली, लातूर.

2) गफूर युनुस बागवान वय पंचवीस वर्ष ,राहणार साळे गल्ली, लातूर.

3) अमर चंद्रकांत पोळ, वय 28 वर्ष राहणार साळे गल्ली, लातूर.

4) अझर मेराज खाटीक, वय 22 वर्ष, राहणार ,आझाद चौक, लातूर व  पळून गेलेले 08 आरोपी पैकी आरोपी नामे

1) गौस मजर अली शेख, राहणार ताजुद्दिन बाबा नगर लातूर.

2) गणेश वंजारे राहणार साळे गल्ली, लातूर.

 यांचे कडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 10,350/-रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 12 इसमाचे  विरुद्ध  पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं. 427/2021 कलम. 4,5, मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              सदर गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या