आ. अभिमन्यू पवार यांनी जलजीवन मिशन व इतर विकासकामांचा घेतला आढावा

 

आ. अभिमन्यू पवार यांनी जलजीवन मिशन व इतर विकासकामांचा घेतला आढावा

आ. अभिमन्यू पवार यांनी जलजीवन मिशन व इतर विकासकामांचा घेतला आढावा

औसा – कासार सिरसी, आलमला, तळणी, चिंचोली जो. आदी गावांसह मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा तसेच केंद्रीय मार्ग निधी, राज्य निधी विशेष दुरुस्ती, पुरनीना, बार्ड, जिल्हा वार्षिक योजना निधी, जनसुविधा निधी आदी योजनांअंतर्गत मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.२० जुलै रोजी औसा येथे घेतला  ‘शेत तिथे रस्ता’ अभियानाच्या दुसऱ्या टप्यातील शिव व पाणंद रस्ते कामाला दिवाळीत सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे सांगून त्याअनुषंगाने शेतरस्त्यांच्या कामांचे ग्रामपंचायतकडून प्रस्ताव मागविण्यात यावेत, मातीकाम व दबई पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या मजबुतीकरण कामाला मनरेगाअंतर्गत तर मातीकाम व दबई कामांना आमदार निधीअंतर्गत मंजुरी देण्याचे काम पावसाळ्यातच पूर्ण करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी दिल्या.

किल्लारी व ३० खेडी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने २८ कोटी रुपयांचा निधी केला होता; सदरची कामे महिनाअखेरपर्यंत सुरु करावेत, मातोळा १० खेडी पाणीपुरवठा योजनेच्या राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या पाइलाईन चे व खरोसा ६ खेडी पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत, सर्व मोठ्या पाणीपुरवठा योजना सौरऊर्जा संचालित करण्यासाठी मेडा मार्फत अंदाजपत्रक सादर करावे, गावातील पाणीपुरवठा योजनांची थकीत वीजबिले १५ व्या वित्त आयोग निधीतून भरण्यासाठी ग्रामपंचायतींना तातडीने परवानगी देण्यात यावी, मतदारसंघातील पुलांचे काम बंधारे बांधकामांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, शासकीय विश्रामगृह बांधकाम, व्यापारी संकुल उभारणी, महसुल व पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान बांधकाम साठी निधी मंजूरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा, निम्न तेरणा प्रकल्पातील वाहून जाणारे पाणी उपलब्ध असल्याने नवीन साठवण तलावांचे सर्वेक्षण करुन पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, सिमेंट बंधारे व पाझर तलावांचे दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. दुरुस्ती योग्य नसलेले जुने बंधारे नविन सिमेंट बंधारे बांधकाम करण्यासाठी प्रस्तावित करण्यात यावेत, नाला खोलीकरण झालेल्या साईट्सचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी बंधारे बांधकाम करण्यात यावेत” आदी महत्वपूर्ण सूचनाही याा बैठकीत संबंधितांना दिल्या.या बैठकीला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, कार्यकारी अभियंता बांधकाम थोरात, गंगथडे, म. जि. प्रा चे कार्यकारी अभियंता कायदे, जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता शेलार यांच्यासह विविध खात्यांचे तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या