_बनावट सिटी सर्वे च्या आधारे बोगस 8/अ तयार करून देणाऱ्या न प कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची जय महाराष्ट्र सेनेची मागणी_*

 *_बनावट सिटी सर्वे च्या आधारे बोगस 8/अ तयार करून देणाऱ्या न प कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची जय महाराष्ट्र सेनेची मागणी_*






औसा (प्रतिनिधी):- औसा नगर परिषदेतील नामांतर विभागातील कर्मचारी श्रीराम ताकभाते व तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी औसा येथील बनावट सिटी सर्वे आधारे अनेक शासकीय व खाजगी जागा न प च्या मालमत्तेवर अतिक्रमण करून दिले आहे हद्दीतील जमिन सर्वे नंबर 3 भीम नगर येथील वडिलोपार्जित मालक समद शेख यांच्या दोन गुंठे जागेपैकी काही जागेवर बोगस सिटीसर्वे भूमापन क्रमांक 16 74 च्या आधारे शरद देविदास बनसोडे यांच्या नावावर कोणतेही प्रकारचे खरेदीखत व दस्त नसताना नगर परिषद  रेकॉर्ड ला तयार करून आहेत.

तसेच औसा शहरातील इतर नगरपालिकेच्या व खाजगी लोकांच्या जागेवर साल सन 2018 पासून ते 2000 21 मे महिन्यापर्यंत अशा अनेक बोगस गुंठेवारी पावत्या बोगस नामांतर असे अनेक घोटाळे नगरपालिकेत झालेले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी संबंधित कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने  दिलेल्या निवेदनात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या