पेट्रोल, डिझेल व घरगूती गॅस महागाई विरोधात औशात काॅग्रेस पक्षाचे आंदोलन
सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधात नोंदविला निषेध
औसा प्रतिनिधी
मुख्तार मणियार
औसा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या जीवघेण्या महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेसच्या सुचनेनुसार औसा तालुका काँग्रेस कमिटी व औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 जुलै मंगळवार रोजी औसा येथे किल्ला मैदान ते उदय पेट्रोल पंप पर्यंत "सायकल रॅली" काढून इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आंदोलन करत्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंत राचट्टे, प्रा. सुधीर पोतदार,विलासराव देशमुख युवा मंचचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला, अॅड समीयोद्दीन पटेल, अॅड शाहनवाज पटेल, अँड फैयाज पटेल, निशांत राचट्टे, पवन कांबळे,व अॅड मंजुषा कसबे, जयराज कसबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले,माजी नगरसेवक विवेक मिश्रा, गुलाब शेख,, हमीद
सर,वहीद कुरेशी,सय्यद हमीद,खाजाभाई शेख, सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष बजरंग बाजुळगे, हरीभाऊ शिंदे, भागवत म्हेत्रे, मुकेश पुंड, राजेंद्र बनसोडे,गितेश शिंदे, गणेश कसबे, जयराज ठाकुर,माजीद काझी,दिपक राठोड,व्यंकट जाधव, दिपक कांबळे,नंदकुमार सरवदे,अल्ताफ देशमुख,नियामत लोहारे, मुहम्मद मुंगले,शादाब हन्नुरे,आदि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.