प्रशासनाकडून पावणेदोन कोटींवर खर्च, तरीही आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती*

 *प्रशासनाकडून पावणेदोन कोटींवर खर्च, तरीही आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती*






दि. 16 - उस्मानाबाद -



तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीला पाच वर्षातच पावसामुळे गळती लागली आहे. यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला होता. यानंतर ठेकेदारामार्फत सन २०१६ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. या इमारतीचा देखभालीचा कालावधी तीन वर्षांचा होता. तो आता संपला असून, तब्बल पाच वर्षांनंतर ओपीडीसमोर सिमेंट छताला तसेच रुग्ण दाखल करावयाच्या वॉर्डात देखील पावसामुळे गळती लागल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात खर्च करून टोलेजंग इमारत बांधली असली तरी गळती लागल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस गळती लागल्याचे समजताच सरपंच रामेश्वर तोडकरी यांनी भेट देऊन पाहणी केली.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या