२६ टक्केच पीक कर्जाचे केले वाटप*

 *२६ टक्केच पीक कर्जाचे केले वाटप*





दि. 16 - उस्मानाबाद -


तालुका प्रतिनिधी / **सय्यद महेबुब **

खरीप हंगामात यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, जिल्हा बँकेस १,५३९ कोटी ८० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. बँकांच्या उदासीन धोरणामुळे आतापर्यंत २६ टक्के पीककर्ज वाटप करुन ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.


जिल्ह्यात वर्षा दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी अतिवृष्टी, आर्थिक अडचणीत सापडत चालले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खत खरेदीस तसेच अन्य शेतीकामात अडथळे येऊ नयेत, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करुन दिले जात असते.


यंदा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. १ एप्रिल पासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यात कोविड प्रतिबंधासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदी ही लावण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात एसटीची वाहतूक सेवाही ठप्प होती. परिणामी, वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात बँकामध्ये येता येत नव्हते. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास अडथळे निर्माण होत होते. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करुन पेरणी उरकून घेतली. त्यानंतर पीकांना खत तसेच खुरपणी, कोळपणी, खतासाठी शेतकरी पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. मात्र, बैंकाच्या उदासीन धोरणामुळे जून अखेर केवळ ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४०२ कोटी ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी २६ टक्के इतकी आहे.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या