*कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू*
*दि. - 11 - उस्मानाबाद*
*कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरु*
*१. जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्याच्या शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत.*
*2. जिल्हा रुग्णालयामध्ये हनिया, अपेंडिक्स, अस्थी, कान-नाक घसा, पोटाच्या शस्त्रक्रिया आता नियमितपणे होत आहेत.*
*3. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे नियमित प्रसूती तसेच सिझेरियनच्या शस्त्रक्रिया होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.*
*मागील पंधरा दिवसापासून जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ववत सुरु झाल्या आहेत. सध्या हर्निया, कान-नाक-घसा, अस्थी, पोटाच्या, डोळ्याच्या तसेच अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. आठवड्यात ३० ते ३५ शस्त्रक्रिया पार पडत आहेत. कोरोना काळात आतररुग्ण विभागात ५० रुग्ण उपचासाठी दाखल होत असत. सध्या यामध्ये वाढ झाली असून, आंतररुग्ण विभागात दीडशेच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. - डॉ. सचिन देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक असे त्यांनी सांगितले.*
कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर उपचारार्थ अधिक व्यस्त होती. त्यामुळे इतर आजारांवरील शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्यांना काही काळ त्रास सहन करावा लागला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. प्रतिदिन १० ते १५ शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा रुग्णालयातील हर्निया, अस्थी, कान-नाक-घसा, मोतीबिंदू, अपेडिक्स अशा आजाराच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. अपघातानंतर गुंतागुतीची शस्त्रक्रिया तसेच अपेंडिक्सचा अधिक त्रास असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मात्र केल्या जात होत्या. कोरोना संसर्गाचा कहर सुरू असल्याने प्रवासातील गर्दीस रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी प्रतीक्षा करणेच पसंत केले होते. जुलै महिन्यापासून नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. आठवड्याला तीसहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या या शस्त्रक्रिया सुरू झाल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.