औश्यात मुस्लिम ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात बैठकिचे आयोजन
औसा: दि.१४ - ओबिसीचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यामुळे ऑल इंडिया मूस्लिम ओ.बि.सि संघटनेने दि. १५ जूलै २०२१ रोजी दूपारी २:०० वाजता रेस्ट हाऊस औसा येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या उपस्थितित जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकित मुस्लिम ओबिसि समाजाच्या समस्यांवर विचार विमर्श करून पुढिल दिशा ठरवण्यात येईल. तालुकाध्यक्ष डॉ. वहिद खुरेशी यांनी या बैठकीचे आयोजन केले असुन जिल्ह्यतिल संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कलिमोद्दिन अहमद शेख यांच्या द्वारे कळविण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलिप कुमार यांनी अनेक सामाजिक संघटनाना सहकार्य केले. यातच ऑल इंडिया मूस्लिम ओ.बि.सि संघटनेला दिलिप कूमार यांनी उघड व भरभरून सहकार्य केले होते . त्यांनी सोनिया गांधी, विलासराव देशमुख राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे वेळोवेळी संघटनेसोबत सहकार्याची मागणी केली होती. दिलिप कूमार( युसूफ खान ) यांच्या जाण्याने संघटनेची खूप हानी झाली आहे. असे मत कलिमोद्दिन अहमद यांनी व्यक्त केले
. या बैठकिला उपस्थित राहाण्याचे आवाहन औसा तालुका अध्यक्ष वहिद कुरेशी यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.