*स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, 14 किलो गांजा पकडला, 98,490/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
लातूर प्रतिनिधी या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विळेगाव शेत शिवार गट नंबर108/5 तालुका देवनी येथे छापा टाकून शेतात असलेली गांजाची झाडे एकंदरीत 14 किलो 700 ग्रॅम गांजा मुद्देमाल किंमत अंदाजे 98,490/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या फिर्याद वरून
1) सत्यवान रघुनाथ देवशेटवार
2) दामू लक्ष्मण पाटील, दोघे राहणार विळेगाव यांच्या विरोधात पोलिस ठाणे देवनी येथे गुन्हा रजिस्टर नंबर. 211/2021 कलम 20 (अ), 20 (ब) , 2 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act ) 1985 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच वरील नमूद आरोपी फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे, देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कामठेवाड यांचे नेतृत्वाखाली नायब तहसीलदार श्रीमती सविता माडजे, सपोनि सुधीर सूर्यवंशी पोलीस अंमलदार सूर्यवंशी ,नामदेव पाटील ,खुर्रम काझी ,सदानंद योगी ,बालाजी जाधव तसेच देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार कांबळे ,बुजारे, बनाळे व दोन शासकीय पंचासह दिनांक 13/07/2021 रोजी विळेगाव तालुका देवनी या ठिकाणी सत्यवान रघुनाथ देवशेटवार यांचे शेतात छापा मारला असता त्या ठिकाणी गांजाची झाडे मिळून आली, सदरचा मुद्देमाल 14 किलो 700 ग्रॅम एवढा गांजा मुद्देमाल किमती 98,490/- रुपयाचा पोलिसांनी जप्त केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. कामठेवाड हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.