रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन व रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आणि आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या
नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी (दि.२१ जुलै )उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल रवींद्रदादा साळुंके,सहाय्यक प्रांतपाल डॉ.लक्ष्मीकांत डिग्गीकर यांची उपस्थिती होती.या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे नूतन अध्यक्ष म्हणून सतीश कडेल व सचिव म्हणून दिनेश सोनी आणि अनिल टाकळकर यांनी मावळते अध्यक्ष अनुप देवणीकर व सचिव रवींद्र बनकर यांच्या कडून पदभार स्वीकारला.
रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष म्हणून प्रसाद वारद ,सचिव सत्यजित धर्माधिकारी व सचिव निखिल कुलकर्णी यांना मावळते अध्यक्ष सुश्रुत धर्माधिकारी व सचिव अंकिता बिरनाळे यांनी पदभार प्रदान केला.
याप्रसंगी रोटरी परिवारातील माजी प्रांतपाल विजयभाऊ राठी,माजी सहाय्यक प्रांतपाल रामप्रसाद राठी सहाय्यक प्रांतपाल,डॉ. सुचिता भालचंद्र,माजी सहाय्यक प्रांतपाल डॉ.माया कुलकर्णी,रोटरी क्लब श्रेयशच्या अध्यक्षा सौ. सुभद्रा घोरपडे,रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे सचिव डॉ कैलाश वारद,रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष नाणिक जोधवानी,रोटरी क्लब लातूर मेट्रोचे अध्यक्ष रवी हिंगणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात रोटरीचे उमाकांत मद्रेवार,रविंद्र बनकर,वीरेंद्र फुंडीपल्ले,
श्रीप्रकाश बियाणी,
डॉ.श्रीनिवास भंडे,चेतन पंढरीकर,जगदीश कुलकर्णी,ओमप्रकाश झुरुळे,चंद्रप्रकाश अग्रवाल, श्रद्धानंद अपशेट्टी,डॉ. चंद्रप्रकाश जंगमे यांच्यासह अमोल घाडगे,डॉ.किरण दंडे, जयेश पेद्दे,कपिल पोकर्णा, कपिल डुमणे,सुशील राठी, चंद्रकांत गस्तगार,मोतीलाल वर्मा,किशन कूलेरिया, विष्णुदास तोष्णीवाल यांनी विविध विभागांचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष म्हणून प्रसाद वारद व सचिव सत्यजित धर्माधिकारी, निखिल कुलकर्णी यांच्या समवेत श्रीनाथ चिद्रेवार, मयुर कडेल,वेदिका गोरे,
अभिजीत देशमुख ,श्वेता जेऊरकर ,अजिंक्य निकम, शामली धन्ना,आदित्य शास्त्री, अंकिता बिरनाळे,स्नेहा मोटे, यश सोनी,देशपांडे, विशाखा धर्माधिकारी,जीवन पाटील,
ऋषिकेश कुलकर्णी, हितेश वर्मा व आदिती दर्डा यांनीही कार्यकारिणी सदस्य म्हणून पदभार स्वीकारला.
सहाय्यक प्रांतपाल डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर यांनी प्रांतपाल ओम मोतीपोवळे यांचा संदेश वाचून दाखवला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी प्रांतपाल रवींद्रदादा साळुंके यांनी समाजकार्यात ग्लोबल ग्रॅंटच्या मदतीने अधिक व कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्यावर भर देण्याचे आवाहन करतानाच समाजातील प्रत्येक स्तरातून रोटरीला प्रतिनिधित्व मिळावे यासाठीही प्रयत्न करावे असे सुचविले.
या कार्यक्रमात मागील रोटरी वर्षात रोटरी फाऊंडेशनला मोलाची मदत करणाऱ्या सभासदांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून विशाल अयाचित यांनी काम पाहिले.महेंद्र दुरुगकर,श्रीनिवास भंडे,
मोतीलाल वर्मा,श्रवण बियाणी,प्रकाश बियाणी, वीरेंद्र फुंडिपल्ले, रवींद्र बनकर, चंद्रकांत गस्तगार, अनिल कुलकर्णी यांनी त्यांना सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश झुरुळे व आभार प्रदर्शन सचिव अनिल टाकळकर यांनी केले.
या कार्यक्रमास रोटरी परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.