वैधता प्रमाणपत्राअभावी
हात्तग्याच्या सरपंच अपात्र
लातूर, / प्रतिनिधी- ठरवून दिलेल्या वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निलंगा तालुक्यातील हात्तरगा हा. येथील महिला सरपंच भाग्यश्री बोटले यांचे सरपंचपद व ग्रामपंचायत सदस्यत्वही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रद्द केले आहे.
निलंगा तालुक्यातील हात्तरगा येथून भाग्यश्री रामकृष्ण बोटले यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. त्यावेळी बोटले यांनी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र सोबत न जोडता प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल केलेली पोहोच पावती जोडली होती. दरम्यान, त्या विजयी झाल्या. आरक्षणानुसार त्या सरपंचही झाल्या. परंतु, त्यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही. यामुळे गावातीलच मधुकर विठ्ठल इंगळे यांनी बोटले यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली. याप्रकरणी दोघांचे युक्तिवाद झाले. प्रमाणपत्र सादर न झाल्याने भाग्यश्री बोटले यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व व सरपंचपद जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रद्दबातल ठरविले आहे. याप्रकरणी फिर्यादी मधुकर इंगळे यांच्यावतीने ऍड. नीलेश मुचाटे यांनी बाजू मांडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.