येलोरी च्या ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी
औसा प्रतिनिधीऔसा तालुक्यातील येलोरी गावचे ग्रामसेवक बनकर हे मनमानी कारभार करीत असून कामचुकार ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना सुद्धा ग्रामसेवक गावात येत नाहीत ,गावात दारू पिऊन येणे, ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरून अपमानित करणे, ग्रामस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावी करीत असून ग्रामसेवक बनकर यांच्या विरोधात वैजनाथ दिगंबर बिराजदार यांच्यासह इतरांनी गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बिराजदार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना भेटून येलोरी च्या ग्रामसेवकास निलंबित करावे अशी मागणी केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांनी गटविकास अधिकारी औसा यांना दिनांक 8 जुलै रोजी ग्रामसेवक बनकर यांच्या तक्रारीची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्यासाठी सुचविले आहे. गट विकास अधिकारी या प्रकरणी टाळाटाळ करीत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता ग्रामसेवकास निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.