*जिल्ह्यातील रस्ते कामांची गुणवत्ता वाढवा-खा, ओमप्रकाश राजेनिंबाळकर*
दि. 17 - उस्मानाबाद -
*रेल्वे विभागामार्फत जे साईट रस्ते केले आहेत, त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. प्रामुख्याने भिकारसारोळा, खामगाव, बुकनवाडी येथील रस्ते दुरुस्त करावेत. वेगवेगळ्या विभागातील ज्या कंत्राटदाराकडे पहिली कामे प्रलंबित आहेत. त्यांना नवीन कामे देऊ नये. उलट अशा कंत्राटदाराचा ब्लॅक लिस्ट प्रस्ताव पाठवावा. तसेच मागील बैठकीला गैरहजर असलेले व अनुपालन अहवाल सादर न केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याबा बतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवावा.*
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील चालू असलेल्या रस्त्याची गुणवत्ता वाढवून पथकाद्वारे पाहणी करावी. तसेच पाच वर्षे देखभाल दुरुस्ती असलेले रस्ते दुरुस्त करावेत, अशा सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या.
येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खा. राजेनिंबाळकर म्हणाले, प्रत्येक गावात निराधार लाभार्थ्यांचे सर्व्हे करून त्यांना न्याय द्यावा. जिल्हा बँकेने निराधारांच्या पगारी विनाविलंब वाटप कराव्यात. १५ ऑगस्टपर्यंत शासनांच्या योजनांची माहिती दर्शनी भागावर लावावी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या कामाचे मस्टर काढण्यास दिरंगाई करू नये. शेतकऱ्यांचे शेत रस्ते मोकळे करण्याची मोहीम या योजनेमधून करावी. प्रत्येक गावात किमान २ कामे चालू ठेवावीत. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येकी १-१ काम चालू करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, दिशा समिती सदस्य कांचनमाला संगवे, नगसेवक गटनेते तथा नगसेवक सोमनाथ गुख आदी दिशा समितीचे सर्व सदस्य तसेच जिल्हास्तरीय सर्व योजनेचे अधिकारी उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.