तिसऱ्या लाटेचे आव्हान पेलण्यासाठी, आता नाही ऑक्सिजनचा तोटा, मुकाबल्यासाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*

 *तिसऱ्या लाटेचे आव्हान पेलण्यासाठी, आता नाही ऑक्सिजनचा तोटा, मुकाबल्यासाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*





दि. 17 - उस्मानाबाद -


 *तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची गरज शक्यतो स्थानिक पातळीवर भागविली जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच •अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २२ जुलैपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडे तयार करून पाठविण्यास सूचित केले आहे. यामध्ये रुग्णालयाची क्षमता व गरज तपासून त्या नोंदी अंतर्भूत केल्या जातील.*



दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुडवडयातून धडा घेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने स्वयंपूर्ण होण्याचा चंग बांधत वेगाने कामे सुरू केली. यातूनच आता जिल्हा रुग्णालयात १३ हजार लिटर्स क्षमतेचा टैंक बसविण्यात येत आहे. शुक्रवारी हा टैंक रुग्णालयात दाखल झाला. शिवाय कमी वेळेत परंडा येथील ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित होत आहे.


दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. तेव्हा पुणे, हैद्राबाद येथून ऑक्सिजन मागवावे लागले. दररोज जवळपास १९ हजार ५०० लिटर्स ऑक्सिजन लागत होते. तेव्हा दमछाक उडाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नियोजन सुरू केले. लोकप्रतिनिधींनीही यास चांगली साथ दिली.


यामुळे अत्यंत कमी कालावधीत ऑक्सिजन प्रकल्प उभे झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयातील १० हजार लिटर्स क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरू आहे. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार लिटर्स क्षमतेचा प्रकल्प १५ ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल. दरम्यान, हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.


जिल्हा रुग्णालयात ३०० एलपीएम तर उमरगा येथे ४२० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. परंडा येथे ५०० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाला असून, जोडणी व चाचणी राहिली आहे. जिल्हा रुग्णालयात १००० एलपीएम, कळंब येथे ६०० एलपीएम तर तुळजापूर येथे  ५०० एलपीएम क्षमतेचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. लवकरच त्यांचेही काम सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या