जिल्हा परिषदेत ‘आरेरावी' पुराण*

 *जिल्हा परिषदेत ‘आरेरावी' पुराण!*




दि. 17 - उस्मानाबाद -


"सदस्य गीते यांनी आपल्या दालनात येऊन आरेरावीची भाषा केली", अशी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे यांनी अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे मांडली. तर "कॅफो केंद्रे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी त्यांच्याशी चांगल्या व सभ्य भाषेत बोललो. त्याचे माझ्याकडे व्हिडीओ चित्रिकरणही आहे", अशा शब्दात सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी आरोप फेटाळून लावले. त्यामुळे जिल्हा परिषदेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते हे दुपारी दालनात आले होते. यावेळी त्यांनी माझा फोन का उचलत नाहीत. सदस्यांना आपण सन्मानाची वागणूक देत नाहीत, असा आरोप करीत त्यांनी उध्दट भाषेचा प्रयोग केला, असे त्यांनी अध्यक्षा कांबळे, सीईओ गुप्ता यांना सांगितले. यावेळी काही विभाग प्रमुख तसेच कर्मचाऱ्यांनी गुप्ता यांची भेट घेतली. त्यावर मी तुमच्या सोबत आहे. घाबरू नका", अशा शब्दात दिलासा दिला. दरम्यान, या अनुषंगाने जि.प. सदस्य गीते यांच्याशी संपर्क केला असता, कॅफो केंद्रे यांनी केलेले आरोप फेटाळले. मी अत्यंत चांगल्या भाषेत बोललो आहे. ५० लाखांच्या मोटार खरेदी प्रकरणात वित्त विभागाचाही काहीअंशी सहभाग आहे. याबाबत मी आरोपही केले होते. अधिकाऱ्यांना चुकीच्या कामाबाबत जाब विचारल्यानेच माझ्याविरुद्ध हे षडयंत्र रचले आहे. माझ्याकडे कॅफोंसोबत झालेल्या संवादाचे संपूर्ण चित्रिकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे चित्रिकरण पाहिल्यानंतर "मी उध्दट बोललो की नाही ते स्पष्ट होते.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या