*पिकांना मिळाला तात्पुरता आधार, शेतकर्यांना तेवढाच दिलासा*
दि. 12 - उस्मानाबाद -
तालुक्यातील तेर गावात शेतकर्यांना १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, तेर परिसरातील काही शेतकऱ्यांनी पुढील पावसाच्या भरवशावर पेरणी केली, नेमकी पीक वाढीच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पुनर्वसू नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे या पिकांना तात्पुरता का होईना आधार मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तेर महसूल मंडळात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. गतवर्षी ऐन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने यंदा सोयाबीन बियाणाची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे बहुतांश शेतकरी घरचे बियाणे वापरून पेरणी केली. मात्र, ऐन उगवण प्रक्रियेवेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे हे पिकही संकटात सापडले होते.
पिके वाळल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तेर महसूल मंडळात ३० जून अखेर १००.५ मिमी तर १० जुलै पर्यंत ६४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.