जिल्हा क्रीडा सीएसआर समिती कागदावरच, सीएसआर समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळेना*

 *जिल्हा क्रीडा सीएसआर समिती कागदावरच, सीएसआर समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळेना*




दि. 12 - उस्मानाबाद -



क्रीडा जगतात उस्मानाबाद जिल्ह्याने स्वतःचे वलय निर्माण केले आहे. क्रीडा क्षेत्रात नेहमी चढता आलेख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे आवश्यक सोयीसुविधांविना आहे, त्या परिस्थितीत हताश न होता खेळाडू वर्षभर मैदानावर घाम गाळून स्पर्धेतआपले कौशल्य अजमावत चांगली कामगिरी बजावताहेत. असे असतानाही या खेळाडूंना सुविधा देण्याच्या बाबतीतही जिल्ह्याचा क्रीडा विभाग नेहमीच उदासीन राहिलेला आहे.

       केंद्र व राज्य सरकार क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे. प्रत्यक्षात मात्र आजवर अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदकांसह पुरस्कार विजेते क्रीडापटू घडविणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोयीसुविधांसाठी झगडावे लागत आहे. यातच लातूरमध्ये यशस्वी झालेला क्रीडा सीएसआर उपक्रम जिल्ह्यात मात्र ठप्प आहे.


 *जिल्ह्यात क्रीडा सीएसआर समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, ती फक्त कागदावरच, समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, क्रीडा उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्रा.) व शिक्षणाधिकारी (मा.) हे सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा क्रीडाअधिकारी आहेत. समितीची आजतागायत एकही बैठक झालेली नाही. हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आजतागायत कसलाही प्रयत्न केला गेला नसल्याने क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.*


या दृष्टीने राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उद्योजकांचा सहभाग घेणे (सीएसआर) व याअंतर्गत कार्यान्वित होणाऱ्या क्रीडाविषयक प्रकल्पाचे समन्वय व संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धोरण तयार करीत जिल्हा, आयुक्त व राज्यस्तर समित्यांची संरचना करण्यातआली. या समित्यांमध्ये क्रीडा संघटना व तज्ज्ञ व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले. क्रीडा सीएसआर धोरणानुसार क्रीडा प्रबोधिनीमधील पायाभूत सुविधा बळकट करणे, क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्तीसहसंकुलात अद्ययावत सुविधा उपलब्ध करणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, उदयोन्मुख व प्रतिभावंत खेळाडूंना अर्थसाहाय्य करणे, खेळाडूंना देशांतर्गत व देशाबाहेर प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, पारितोषिक विजेत्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देणे आदी महत्त्वपूर्ण बाबींचा यात समावेश आहे. आपल्याकडे सीएसआर समितीही स्थापन झाली. परंतु, आजवर या समितीची एकही बैठक झालेली नाही, हे विशेष.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in


 *उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या