*१५ केंद्रावर मिळणार ‘कोव्हॅक्सिन' चा डोस*
दि. 12 - उस्मानाबाद -
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी अद्याप कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी १५ केंद्रावर कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध करून दिला असून, यापैकी ३ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटांस तर १२ केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस मिळणार आहे.
जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही •महिन्यांत कोरोनाची तिसरी लाटयेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण, तसेच शहरी भागात वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील १५ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना सहा ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस दिली जाणार आहे. या १२ केंद्रावर ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना प्राधान्य असणार आहे.जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, पोलीस रुग्णालय या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटांस लस घेता येईल. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.