राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ! - हवामान विभागाचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर*

 *राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ! - हवामान विभागाचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर*





अल्ताफ शेख, प्रतिनिधी/ उस्मानाबाद

 महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे - यामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यात मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे


 त्यानुसार पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अ‌लर्ट जारी केला आहे - असा इशारा भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे


 *कशी आहे पुढील स्थिती ?*


● *आज 22 जुलै रोजी* - सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌लर्ट देण्यात आला आहे - तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून - नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे 


● *23 जुलै रोजी* - सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून - यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे


● *24 जुलै रोजी* - राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे - तर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे


 *हवामान विभागाने दिलेली* - हि माहिती, आपल्यासाठी नक्कीच खुप महत्वाची आहे -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या