गावातील व शिवरस्ता अतिक्रमण काढण्यासाठी अनेक
महिलांनी अडवली औसाच्या आमदाराची गाडी
औसा प्रतिनिधी विलास तपासे
आज औसा तालुक्यातील तुंगी येथे देवेंद्र
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय
फळ उद्योग वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी
आमदार अभिमन्यू पवार यांना एक किलोमीटर खराब रस्त्याने व अतिक्रमण केलेल्या रस्त्याने नेण्यात आले.
कारण की अनेक वेळा नागरिकांनी तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायतीला निवेदन देऊन त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांना एक किलोमीटर खराब रस्त्याने व अतिक्रमण केलेल्या रस्त्याने नेऊन नागरिकांनी जाणून बुजून हा कार्यक्रम ठेवला रस्ता खराब व अतिक्रम असल्याचे लक्षात यावे म्हणून तुंगी शिंदाळा ह्या रस्त्याचा एक किलोमीटरचा प्रवास करायला लावला.
वृक्षारोपण करुन परत येताना गावातील तरुण युवकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या गाडीसमोर
आडव्या मोटार सायकल लावल्या व रस्त्यावर दगडे टाकली. त्यावेळी अनेक महिलांनी आमदार अभिमन्यू पवार यांची गाडी अडवून गावातील शिवरस्ता गावातील अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. त्यावेळी आमदार अभिमन्यू पवार गाडीच्या खाली उतरून महिला व नागरिकांना
सांगितले की गावातील झालेल्या रस्त्याचे अतिक्रमण
हे ग्रामपंचायत मोकळे करून देईल शिवरसत्याबद्दल
सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून दोन_तीन दिवसात मार्ग काढणार आहोत असे सांगितले . त्यावेळी अभिमन्यू पवार यांनी नागरिकांची व महिलांची समजूत काढली. त्या वेळी काही महिला व नागरिक समाधानी झाले व काहीजण नाराज झाले. आमदार अभिमन्यू पवार गाडीत बसून पुढील कार्यक्रमासाठी गेले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.