हायमास्टवर सव्वाकोटींचा खर्च: पाच ' महिन्यांतच 'गुणवत्ते'चे पितळ उघडे !

 *हायमास्टवर सव्वाकोटींचा खर्च: पाच ' महिन्यांतच 'गुणवत्ते'चे पितळ उघडे !*






दि. 22 - उस्मानाबाद -


 *वाशी तालुक्यातील पारगाव केंद्रातील एका हायमास्टचा पहिला आणि चौथा पॉईंट (बल्च) बंद आहे. पारा केंद्रातील तर दोन्ही दिव्यांचा पहिला व चौथा पॉईट बंद पडला आहे. तेरखेडा केंद्रातील एका दिव्याचा तिसरा व चौथा, तर दुसऱ्या दिव्याचा पहिला व चौथा पॉईंट बंद आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी आरोग्य केंद्राचे दिवे बंद आहेत. भूम तालुक्यातील पाथरूड केंद्रातील हायमास्टचा पहिला व चौथा पॉईंट बंद आहे.*


*लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोन्ही खांबावरील एकेकच दिवा सुरु आहे. उर्वरित बंद पडले आहेत. तुळजापूर तालुक्यातील सलगरा, जळकोट, मंगरुळ केंद्रातील दिव्यांचा पहिला व दुसरा पॉईंट बंद आहे. म्हणजेच येथील सर्वच दिवे बंद असल्यात जमा आहेत. उमरगा तालुक्यातील आलूर केंद्रातील दिवेही बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च होऊनही रुग्णांसह डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.*


*स्वच्छ व पारदर्शक कारभार करणारे १ पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती धनंजय सावंत यांची ओळख आहे. यांच्याच विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रात जवळपास सव्वाकोटी रुपये खर्च करून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. मात्र, पाच ते सहा महिन्यांतच बहुतांश आरोग्य केंद्रातील दिवे बंद पडल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे, दिव्यांच्या गुणवत्तेकडे सावंतांचे दुर्लक्ष कसे? यामागचे इंगित काया असे लक्ष झालेनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.*


ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रही हायमास्टच्या उजेडात उजळून निघावीत, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीकडून घेण्यात आला होता. या निर्णयामागचा हेतू चांगला असला तरी ते काम दर्जेदार व्हावे, यासाठीही आरोग्य समितीचे प्रमुख तसेच प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे होते. परंतु, आजघडीला अनेक आरोग्य केंद्रातील हायमास्टच्या दिव्याखाली अंधार (बल्ब बंद पडले) निर्माण झाल्याने गुणवत्तेकडे संबंधितांनी किती लक्ष दिले, हे समोर येते. गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यामागचे इंगित काय, असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.


जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी जवळपास ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. या केंद्रांच्या परिसरातच डॉक्टर, कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही आहेत. आरोग्य केंद्र तसेच निवासस्थाने हायमास्टच्या प्रकाशात उजळून निघावीत, यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीकडून घेण्यात आला होता. ज्याचे प्रमुखपद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडे आहे. प्रत्येक केंद्रासाठी साधारणपणे तीन लाखांची तरतूद करण्यात आली. म्हणजेच ४४ केंद्रांसाठी मिळून सव्वाकोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. या रकमेतून मार्च २०२१ पूर्वी आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन याप्रमाणे ८८ हायमास्ट बसविण्यात आले. हे बिल मार्च महिन्यात संबंधित एजन्सीला वर्गही झाले. म्हणजेच, ही सर्व कार्यवाही होऊन अवघ्या पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच हायमास्टच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. 'लोकमत'ने रॅन्डमली आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेतला असता, कुठे एका हायमास्टचे दोन दिवे बंद आहेत. कुठे एक दिवा बंद आहे, तर कुठे एका खांबावरील सर्वच दिवे बंद पडल्याने अंधार निर्माण झाला आहे. बंद पडलेल्या दिव्यांचे प्रमाण पाहिले तर ते गुणवत्तेच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे प्रत्येक हायमास्टचे ऑडिट झाल्यास निविदेप्रमाणे कामे झाली का? निविदेत नमूद केलेल्या कंपनीच्या वा क्षमतेचे दिवे बसविले का? लोखंडी खांबाचे निकषाप्रमाणे वजन आणि दर्जा आहे का? नसेल तर गुणवत्ता तपासणी करणाऱ्या यंत्रणेने काय केले? त्यांनी कोणाच्या इशाऱ्यावरून डोळेझाक केली? हे समोर येऊ शकते. यासाठी गरज आहे ती स्पॉटवर जावून निःष्पक्ष चौकशीची.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* * प्रतिनिधी **महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या