*युवा सेनेकडून रुग्णांना बायपॅप मशीनचे वितरण*
दि. 22 - उस्मानाबाद -
ग्रामीण रुग्णालयात : परिसरातील कोरोना रुग्णांना अत्यावश्यक रुग्ण सेवा मिळावी यासाठी युवा सेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या बायपॅप मशीनचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके, युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, प्रशांत चेडे, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, तालुकाप्रमुख अॅड. सत्यवान गपाट, बाबा घोलप आदी उपस्थित होते.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी या मशीनबाबत माहिती दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.कपिलदेव पाटील यांनी हे मशीन कोविड रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णांना देऊन ग्रामीण रुग्णालय स्तरावर त्यांना उपचार देऊन बरे केले जाईल, असे सांगितले. प्रस्ताविक परमेश्वर तुंदारे यांनी केले. या कार्यक्रमास सतीश शेरकर, शिवहार स्वामी, धर्मराज जगताप, बाळासाहेब मोळवणे, छगन मोळवणे, बाळासाहेब सुकाळे, तात्या बहीर, लायक तांबोळी व वाशी परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी, तसेच रुग्णालयातील डॉ. विनोद पवार, डॉ. संजीव गरड, डॉ. सोनाली गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन महिंद्रकर, रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* * प्रतिनिधी **महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.