बेसल इंप्लांटसच्या माध्यमातून तीन दिवसात दंत रोपण
चार महिन्यांचे उपचार तीन दिवसात
अद्ययावत तंत्रज्ञान लातुरात
लातूर/प्रतिनिधी:दंत रोपण अर्थात दाताची कवळी बसवण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान आता लातूर शहरात उपलब्ध झाले आहे.बेसल इंप्लांट्स या तंत्रज्ञानाने केवळ तीन दिवसात दंत रोपण करणे शक्य असून पूर्वीच्या काळी यासाठी लागणारा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आता कमी झाला आहे.
डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या रुग्णालयात हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
दिल्ली येथील सुप्रसिद्ध इम्प्लांटॉलॉजिस्ट डॉ.विवेक गौर यांनी डॉ.कुलकर्णी यांच्या रुग्णालयात यासंबंधीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.डॉ.गिरीश कुलकर्णी व डॉ.राकेश वाळिंबे यांच्या सहकार्यातून सलग तीन दिवस लातूरमध्ये अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापूर्वी औरंगाबाद,पुणे अशा मोठ्या शहरात डॉ.गौर यांनी या पद्धतीने दंतरोपण केलेले आहे.लातूरमध्ये प्रथमच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करून दंतरोपण करण्यात आले.
या नव्या तंत्रज्ञानामुळे दातांची कवळी कायमस्वरूपी बसवता येते तसेच म्युकरमायकोसिसमुळे ज्या रुग्णांचा वरचा जबडा व नाक शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागले आहे अशा रुग्णांनाही नाकाचे प्रॉस्थेसिस करता येऊ शकते. जबड्यासह कवळी देखील बसवता येते,अशी माहिती डॉ.गौर यांनी दिली.
डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.राकेश वाळिंबे यांनी डॉ. गौर यांच्याकडून या पद्धतीचे प्रशिक्षण घेतलेले आहे.आता लातूर मध्ये बसस्थानकाजवळील सुनील टेरेस येथे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या दवाखान्यात हे उपचार आता नियमितपणे उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.