हसाळा गावातील जिल्हा परिषद इमारत कोसळली बेलकुंड जि. प प्रशाला ची इमारत कोसळण्याच्या मार्गावर

 हसाळा गावातील जिल्हा परिषद इमारत कोसळली 


बेलकुंड जि. प प्रशाला ची इमारत कोसळण्याच्या मार्गावर

जिल्हा परिषद लक्ष देणार का 

मंजूर असलेले इमारतीचे पैसे दुसरीकडे वळवले








औसा प्रतिनिधी विलास तपासे 

बेलकुंड जिल्हा परिषद शाळामध्ये गेल्या आठ दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे गेल्या दहा वर्षांपासून दहावी बोर्डाचा निकाल ९०

 ९५ टक्के लागत आहे शाळेमध्ये स्कॉलरशिप,

 एन. एम. एम. एस,  एन. टि. एस. ई, मंथन अश्या अनेक स्पर्धा परिक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जाते  तसेच शालेय  व्यवस्थापन समितीने शाळांमध्ये सी. सी टिव्ही कॅमेरा बसवले आहे तसेच विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी गैरसोय होत होती म्हणून शाळेमध्ये बोर पाडून विद्यार्थ्यांना पाण्याची सोय केली आहे तसेच शाळेमध्ये २०० वृक्ष लावून शाळेमध्ये नंदन वन केले आहे शालेय व्यवस्थापन समितीने अनेक विकासात्मक कामे केली आहे परंतु जिल्हा परिषद ने नेहमीच या शाळेकडे दुर्लक्ष केले आहे 

 बेलकुंड जिल्हा परिषद शाळा पहली ते दहावी आहे 2019 ते 20 मध्ये इमारती बांधकामासाठी जिल्हा परिषद लातूर अंतर्गत वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण)  मध्ये माध्यमिक शाळा इमारत बांधकामासाठी साठी 

२३. ००लक्ष  रुपये  एवढ्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती परंतू त्यावर आजपर्यंत कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही व इमारत बांधकामासाठी कार्यरंभ  आदेश मिळालेली नाही.

ह्या शाळेचा निधी कोरोना काळात औषध उपचारासाठी दिले असल्याचे अधिकारी सांगतात  जिल्हा परिषद शाळेची इमारत १९६० मध्ये निजामकाळीन  लोकवर्गणीतून बांधण्यात आली असल्याचे जाणकार मंडळी सांगतात. हे बांधकाम दगडी व पांढऱ्या मातीचे आहे त्याच्यावर सिमेंट कॉनकरेट चे प्लास्टर करण्यात आले अनेक वेळा जिल्हा परिषद ने दुरुस्ती च्या नावाखाली त्या इमारतीवर सिमेंट कॉनकरेट चा बोजा टाकुन थातूरमातूर कामे केली आहेत  

शासनाने एक दोन खोल्या मंजूर करुण दिल्या पण तेही खोल्या पाऊस आल्या की गळत असतात निजामकालीन पाच खोल्या कोणत्याही प्रसंगी कोसळण्याच्या स्थितीत आहेत प्रशासनाने गांभीर्य नाही घेतले तर आज इमारत कोसळल्या शिवाय राहणार नाही 

परवाच  हासाळा ता. औसा येथील शाळेची इमारत कोसळली शाळा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु बेलकुंड जिल्हा परिषद शाळा मध्ये आठवी नववी व दहावी चे वर्ग चालू आहेत ग्रामपंचायत ने ठराव देवून पालकांच्या समितीने आठवी नववी चे वर्ग सुरु केले आहेत शाळा व्यवस्थापन समिती यांनी अनेक वेळा लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कडे वेळोवेळी नवीन इमारतीची मागणी केली आहे परंतु राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी ही ह्या मागणीला कचराच्या टोपलीत टाकले आहे.

-----------------------------------------------------------------


परवाच हासळा गावातील शाळेची इमारत कोसळली तशीच अवस्था बेलकुंड जिल्हा परिषद शाळेची आहे ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन बेलकुंड जिल्हा परिषद शाळा ची इमारत ला जो निधी मंजूर झाला तो लवकरात लवकर देण्यात यावा अन्यथा शाळा बंद करून शाळेला कुलूप घालण्यात येईल येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास तपासे यांनी दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या