गॅस, पेट्रोल, डिझेल इंधदरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंची महागाई
केंद्रसरकार विरोधात महिला काँग्रेस पक्षाकडून निदर्शने
दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
इंधन दरवाढीचा निषेध म्हणून
महिला काँग्रेसकडून शेणाची गवरी भेट
लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. ९ जूलै २१)
स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलची इंधन दरवाढ आणि दाळ, खादयतेल व इतर जीवनावश्यक वस्तुची मोठया प्रमाणात कृत्रीम महागाई केंद्रसरकारच्या चुकीच्या धारेणामुळे झाली आहे. ही सर्व प्रकारची महागाई वाढल्याने आणि कोरोनाने हातचे रोजगार गेल्याने सामान्य माणूस पिचून गेला आहे. विशेषत: महीलांना घर चालविणे मुश्कील झाले आहे. ही वाढती महागाई तात्काळ कमी करण्यासाठी केंद्रसरकारने पावले उचलावीत अन्यथा सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा लातूर महीला काँग्रेसकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शुक्रवार दि. ९ जूलै रोजी दिला आहे.
इंधन आणि जिवनावश्यक वस्तुच्या वाढत्या महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे. ही वाढती महागाई मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने आदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने लातूर शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा.डॉ. स्मिता खानापूरे, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनिता आरळीकर व महाराष्ट्र प्रदेश सचिव सपना किसवे यांनी पुढाकार घेऊन महिला काँग्रेसच्या वतीने निर्दशने करून महागाईचा निषेध केला. ही वाढती महागाई तात्काळ मागे घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. सामान्य माणसाची लुटमार करणारी इंधन आणि जीवनावश्यक वस्तुची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. निवेदना सोबत शेणाची गवरी भेट देऊन वाढत्या महागाईचा अभिनव पद्धतीने यावेळी निषेध करण्यात आला.
गॅस, पेट्रोल-डिझेल हा सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. डिझेलचे दर वाढल्यास वाहतुकीचा खर्च वाढतो व एकूणच सर्व वस्तूंच्या किमती वाढतात. ही दरवाढ सामान्य लोकांना परवडणारी नसून यामुळे सर्वसामान्य माणसाच्या घर खर्चाचे गणित बिघडून जात आहे हा सर्व त्रास लक्षात घेता केंद्र सरकारने तात्काळ गॅस सह इंधनाचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यायला हवा. अगोदरच कोवीड१९ आजाराने सर्व नागरिक त्रस्त असताना त्यांना आधार देण्याऐवजी केंद्र सरकार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूटमार करत आहे. ती तात्काळ थांबवावी अशी मागणी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी करण्यात आली.
महिला काँग्रेसकडून आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी लातूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता खानापुरे, लातूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिता आरळीकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सपना किसवे, स्वयंप्रभा पाटील, केशरबाई महापुरे, लातूर जिल्हा महिला काँग्रेस सरचिटणीस शोभा ओव्हाळ, अनिता क्षीरसागर, फरजाना शेख, नयना ईरबतनवाड, मिना टेकाळे, सुलेखा कारेपुरकर, कमलबाई मिटकरी, लक्ष्मीबाई बटनपूरकर, साहोरा पठाण, अनिता कांबळे, मंदाकिनी शिरवटे, दिप्ती खंडागळे, वर्षा मस्के, मीना लोखंडे, रुबीना तांबोळी, गोरीबी बागवान, शैलजा आराध्ये, सुनंदा इंगळे, योजना कामेगावकर, दैवशाला राजमाने, सरिता जगताप, मिनाक्षी शेटे, सिमा क्षिरसागर, सुरेखा गायकवाड, पूजा इगे, इंदूताई इगे, संगीता पतंगे आदींसह महिला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होत्या.
चौकट
: इंधन दरवाढीचा निषेध म्हणून
महिला काँग्रेसकडून शेणाची गवरी भेट
गॅसची दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुच्या महागाईमुळे गृहीणीचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसकडून निवेदना सोबत शेणाची गवरी भेट देण्यात आली. तसेच महागाई कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-----------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.