विलासराव देशमुख युवा मंच च्या वतीने महमूद शेख यांना कोरोना योद्धानी सन्मानित
औसा मुख्तार मणियार
औसा नगरपालिकाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी महमुद वजीरसाब शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कुरणा योद्धा म्हणून विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने आज दि.9 जुलै शुक्रवार रोजी नगर परिषद येथे सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कोणाच्या काळात औसा नगरपालिकेच्या वतीने 48 कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी महमूद शेख व त्यांच्या टीमने पूर्ण केले. ज्यावेळी स्वतःचे नातेवाईक सुद्धा कोणी जवळ येण्यास घाबरत होते, अशा वेळी औसा नगरपालिकेचे कर्मचारी महमूद शेख व त्यांच्या टीमने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावले. अशा या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान प्रसंगी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला औसा, काॅग्रेसचे जेष्ठ नेते हरीभाऊ शिंदे,युवा नेते हाजी शेख, हाशिमोद्दीन शेख, मुहम्मद मुगले, नियामत आलुरे आदीची उपस्थिति होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.