*४० हजाराची लाच घेताना परंड्याचा बालविकास प्रकल्प अधिकारी सापडला अँटीकरप्शनच्या जाळ्यात !*
उस्मानाबाद : दि. १९ ( व्यंकटराव पनाळे ) - जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अंगणवाडी करिता आलेल्या एकूण ८६ गॅस कनेक्शन पुरवण्याचे काम देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारल्याने बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण गायके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांची भारत गॅस एजन्सी असून त्यांना आरोपी लोकसेवक श्री नारायण दशरथ गायके, वय ३२ वर्ष, या बालविकास प्रकल्प अधिकारी परांडा, यांनी शासनाच्या योजनेद्वारे परंडा तालुक्यातील अंगणवाडी करिता एकूण ८६ गॅस कनेक्शन पुरवण्याचे काम दिले होते. त्या ८६ गॅस कनेक्शन चे प्रति कनेक्शन ६५६३ रु. ५० पैसे असे एकूण ५ लाख ६४ हजार ४६१ रुपया चे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून प्रति कनेक्शन ५६३ रुपये ५० पैसे असे ८६ कनेक्शनची एकूण ४८ हजार ४६१ रुपये ची मागणी करून तडजोड अंती ४० हजार रुपये मागणी करून ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध परांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले असून त्यांचे मोबाईल क्रमांक सोबत दिले आहेत. प्रशांत संपते, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद त्यांचा मोबाईल नं.९५२७९४३१०० हा असुन गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद मोबाईल क्र. ८८८८८१३७२० असा आहे. अशोक हुलगे, पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद मोबाईल क्र.८६५२४३३३९७ हा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.