बोरी भागात ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
लातूर तालुका काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन
लातूर प्रतिनिधी : १९ जूलै २१
लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरातील किमान पन्नास गावात ढगफुटी होवून सोयाबीन व खरिपाच्या पिकाबरोबर इतर फळझाडे, फुलझाडे, मोठे वृक्ष, लाईट खांब उन्मळून पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने लातूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
चालू खरीप हंगामात दि. १७ व १८ जूलै दरम्यान अचानक लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरातील किमान पन्नास गावात ढगफुटी होवून जोरदार पाऊस् पडला आहे. सोयाबीन व खरिपाच्या पिकाबरोबर इतर फळझाडे, फुलझाडे, मोठे वृक्ष, लाईट खांब उन्मळून पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी लातूर तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर ग्रामीण चेअरमन प्रविण पाटील, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका औसा चेअरमन बबन भोसले, विलास कारखाना संचालक गोविंद बोराडे, संचालक रेणा संभाजी रेड्डी, ज्ञानोबा गवळे तालुका अध्यक्ष ओ.बी.सी सेल, प्रताप पाटील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य सर्वश्री धनंजय वैद्य, अमोल देडे, संजय चव्हाण, अमोल भिसे, अच्युत चव्हाण, संजय चव्हाण, सतिश शिंदे, अंगद वाघमारे, अरुण विर, बालाजी वाघमारे, नरेंद्र आल्टे सरपंच मसला, हरिश्चंद्र कावळे, आशोक सुर्यवंशी, सरपंच कासारगाव दिपक काळे सरपंच बोरगाव, नरेश पवार, उमेश भिसे युवक काँग्रेस सदस्य, चंद्रकांत अडगळे सरपंच वाडीवाघोली, प्रकाश चव्हाण, रणजित झाडके, दिनकर डोपे, परमेश्वर पवार, रणजित पाटील, नरेश पवार, रमेश भिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.