अखेर खैरमोडे परिवाराला मिळाला रेशनिंगच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

 

अखेर  खैरमोडे परिवाराला मिळाला
रेशनिंगच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ





लातूर,दि.१९ःहातगाड्यावर खारीमुरी  विकून घराचा गाडा चालविणार्‍या १० सदस्यीय खैरमोडे परिवाराचा गाडा गेली दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे बंद. परिणामी या कुटूंबाची होणारी परवड शेजारच्या महानंदा हुदकद्रे यांनी पत्रकार बाळ होळीकर यांंच्या कानी घातली,त्यांनी यात लक्ष घालून चार महिन्यांनी आज सोमवार,दि.१९ र्जुलै रोजी खैरमोडे परिवाराच्या पदरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे साठ किलो गहू-तांदुळ मिळवून दिल्याने या परिवाराने होळीकरांसह,तहसीलचे आभार मानले आहेत.
लातूरच्या स्वातंत्र्य सैनिक नगरात,पत्र्याच्या घरात,भेळ- खारीमुरीचा गाडा चालवून तीन मुली,चार मुले,पती-पत्नी आणि भावासह गुजारा करणार्‍या  बबन खैरमोडे यांंच्या परिवाराने मागच्या दीड-दोन वर्षांत त्यांचे आधारकार्ड ऑनलाईन करण्यासाठी विवेकानंद चौकातील भारती यांच्या रास्त दुकानाकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर केली पण दुकानदाराने ती रखडत ठेवून या पात्र परिवारांस अन्न सुरक्षेपासून वंचित ठेवले होते,यासंदर्भात खैरमोडेंच्या शेजारी महानंदा हुलकुद्रे यांनी बाळ होळीकर यांच्या कानी घातले होते.संबंधितांचं रेशनकार्ड व परिवाराचे आधाराकाडे घेवून होळीकरांनी चार महिन्याखाली दुकानादाराकडे ती सादर केली. दोन महिन्यांनी जावून पाहिले तेव्हा त्यावर काहीच झाले नसल्याचे होळीकरांनी १२ मे २०२१ रोजी नायब तहसीदार कुलदिप देशमुख यांंची भेट घेवून सदर गरजू परिवाराला अन्न सुरक्षेचा लाभ देण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच दुकानदाराविरोधात खैरमोडे परिवाराची तहसीलदारांकडे तक्रार केली.त्यावर योग्य ती कारवाई होवून आज सोमवार,दि.१९ जुलै २०२१ रोजी या कुटूंबाच्या सहा सदस्यांचे प्रत्येकी पाच किलो प्रमाणे ३६ किलो गहू आणि २८ किलो तांदुळ मिळून ६० किलो धान्य मिळवून दिले.बबन खैरमोडे यांनी  या मदतीबद्दल होळीकर व तहसीलचे आभार मानले,यावेळी महानंदा हुलकुद्रे,नितीन चालक,संकेत होळीकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या