आ.अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
औसा/प्रतिनिधी: तालुक्यातील हिप्परसोगा येथे आ.अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर पाटील यांची उपस्थिती होती.याप्रसंगी लातूरचे माजी उपमहापौर देविदास काळे, आर्वी गावचे उपसरपंच सचिन सुरवसे,ग्रामपंचायत सदस्य विलास भोसले, मुख्याध्यापक बनसोडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल सोमवंशी, माजी सरपंच हेमंत पाटील, संयोजक जगदीश यादव, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील,ॲड. अमोल सोमवंशी,धनू भोसले,मारुती चेवले,राम पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.जगदीश यादव यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.