धनगर आरक्षणाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडावा - धनगर ऐक्य परिषदेची मागणी...

 धनगर आरक्षणाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडावा - धनगर ऐक्य परिषदेची मागणी... 





औसा/ प्रतिनिधी : - स्वातंत्र्याच्या 70 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे समाजावर अन्याय झाला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणा कडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता धनगर समाजाच्या 

सहनशीलतेचा अंत न पाहता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडावी आणि धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने केली आहे. धनगर ऐक्य परिषदेचे औसा तालुका समन्वयक राम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिलेल्या निवेदनात धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा, आदिवासी समाजाला देण्यात येणाऱ्या सर्व योजनासह 2  हजार कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करावा, आमदार निधीतून तालुक्याच्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर किंवा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सर्वश्री राम कांबळे, औदुंबर बर्डे, ज्ञानेश्वर घोडके, मोहन माळी, अरुण देवकते, आत्माराम मिरकले, कृष्णा दूधभाते, वैभव कोरे, विशाल शिंदे यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या